तांदूळ व्यापाऱ्याकडे सापडले कोट्यावधी रुपये; हवाला व्यवहाराचा पोलिसांना संशय

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये एका तांदूळ व्यापाऱ्याकडे छापा (Raid on rice treader) टाकून पोलिसांनी 1 कोटी 9 लाख रुपये जप्त केलेत. हा सगळा व्यवहार हवालाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याच दुकानातून शहरातील हवाला व्यवहार (Hawala Transections) होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने आता जीएसटी आणि आयकर विभाग तपासणी (Investigated by GST & IT Department) करणार आहे.

पोलीस काही दिवस या दुकानावर लक्ष ठेवून होते. या दुकानात मशीननं नोटा मोजणं सुरू असल्याचं कळल्यावर पोलिसांनी छापा टाकला, यावेळी दुकानातलं चित्र पाहून पोलीसही चक्रावले. अनेक लोकं दुकानात जात होती, पण कोणतंही सामान न घेता रिकाम्या हाताने बाहेर येत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांना संशय आल्याने दुकानावर छापा टाकण्यात आला.

यावेळी दुकानाच्या ड्रॉव्हरमध्ये 200 आणि 500 रुपयांच्या नोटांची बंडलं आढळून आली. पोलिसांनी दुकानाच्या मालकाकडे याबाबत विचारणा केली. पण त्याला याचं उत्तर देता आलं नाही.