जे आमदारांना जमले नाही ते ग्राम पंचायत अध्यक्षाने करून दाखवले; वाचा भाजपचा हेब्बाळकरांवर नेमका काय आहे आरोप

बेळगाव – केंद्रात सत्तेत असणारे नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government) तसेच राज्यात सत्तेत असणाऱ्या बसवराज बोम्मई सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम देण्याचे काम केले. मात्र दुर्दैवाने गेल्या पाच वर्षात बेळगाव ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नाहीत. विद्यमान आमदारांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठी आश्वासने दिली होती मात्र त्यातील बहुतांश आश्वासने पूर्ण झाली नसल्याची टीका विरोधक करत आहेत.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. या भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी होत असताना विद्यमान आमदारांनी या मतदारसंघात साखर कारखाना सुरु न करता सौंदत्ती येथे सुरु केला हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांनी मात्र कोणतेही मोठे पद नसताना अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. काजू प्रक्रिया उद्योग सुरु करून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले जात असून जे आमदारांना जमले नाही ते ग्राम पंचायत अध्यक्षाने करून दाखवले आहे असा दावा भाजपकडून केला जात आहे.