आमदार सत्यजीत तांबे यांनी पुन्हा ‘करून दाखवलं’; वाढीव शिक्षकांची रद्द केलेली २८३ पदं पुन्हा सेवेत

- माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

Satyajeet Tambe – राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील २००३-०४ ते २०१८-१९ या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या १२९३ पात्र शिक्षकांचा समावेश करावा, असा प्रस्ताव शासनदारी मांडण्यात आला होता. याबाबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Former MLA Dr. Sudhir Tambe) यांनी त्यांच्या कार्यकाळात आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी निवडणूक जिंकल्यापासून अनेकदा पाठपुरावा केला होता. आता या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १२९३ शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक यांनी शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. १२९३ पदांपैकी यापूर्वीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात आलेल्या ४२८ पदांपैकी एकूण २८३ पदे पुन्हा नियुक्त करायला सरकारने मान्यता दिली आहे. तसंच उरलेल्या वाढीव पदांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही या निर्णयात म्हटलं आहे.

या शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी डॉ. सुधीर तांबे पदवीधर मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर सत्यजीत तांबे त्यांच्या जागी निवडून आल्यानंतर त्यांनीही हा प्रश्न धसाला लावत वित्त, शिक्षण, उच्च शिक्षण अशा विविध विभागांच्या सचिवांसह बैठका आणि मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याबद्दल आ. तांबे यांनी समाधान व्यक्त केलं.

यंदाची दिवाळी शिक्षकांसाठी आनंदाची
राज्यातील उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवर २८३ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करत होतो. माझ्या वडिलांसाठी तर हा खूपच समाधानाचा क्षण आहे. त्याचप्रमाणे ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा निर्णय आल्याने या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी ही दिवाळी खूपच आनंदाची ठरेल, यात वादच नाही. -आमदार सत्यजीत तांबे

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर