कर्नाटक निवडणुकीत अतिक अहमदची एन्ट्री; भाजपा खासदार म्हणाल्या, “काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी अतिकला गुरू मानायचे”

Karnatka: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Elections) प्रचारात सर्वच पक्ष व्यस्त आहेत. त्याचवेळी आता विधानसभा निवडणुकीत माफिया अतिक अहमदची (Atiq Ahmed) एन्ट्री झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या लोकसभा खासदार शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांनी काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. इम्रान प्रतापगढी अतिकला आपला गुरू मानत होते, असा खळबळजनक दावा शोभा करंदलाजे यांनी केला आहे.

कर्नाटकच्या उडुपी-चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा करंदलाजे म्हणाल्या, “इमरान प्रतापगढी गुंड अतिक आणि अशरफ यांना गुरू मानत होते. ते त्यांना आपला मित्र आणि भाऊ बोलत असत. इम्रान प्रतापगढी काँग्रेसमधून महाराष्ट्रातून राज्यसभेचा खासदार झाले. त्यांनी कर्नाटकात २०१४ मध्ये हिंदुविरोधी भाषणे दिली. इम्रान कर्नाटकात म्हणाले होते की, मुस्लीम हे डोके टेकवणारे नाहीत, तर मुंडके कापणारे लोक आहेत.”

“इम्रान प्रतापगढ़ीचे अतिकसोबत संबंध होते. अतिक अहमद इम्रानच्या कवितांच्या कार्यक्रमात जायचे आणि दोघेही कविता गात. अशा इम्रान यांना काँग्रेसने कर्नाटकात स्टार प्रचारक बनवले आहे. काँग्रेसचा हात गुन्हेगार आणि देशद्रोही माणसासोबत आहे,” असे पुढे शोभा करंदलाजे यांनी म्हटले आहे.