Rajendra Patni passed away | भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, दीर्घ आजाराशी झुंज अपयशी

Rajendra Patni passed away: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन (Rajendra Patni passed away) झालं. वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. परंतु मुंबई येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत (Rajendra Patni passed away) मालवली.

वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. आजच शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं निधन झालं. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचं वृत्त आल्याने, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राजेंद्र पाटणी हे १९९७ ते २००३ या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर २००४ (शिवसेनेकडून), तर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपकडून असे तीन वेळा कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पाटणींच्या निधनाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार