Lasya Nandita | कारवरचं नियंत्रण सुटलं अन् दुभाजकाला आदळली, महिला आमदाराचा जागीच मृत्यू

Lasya Nandita Car Accident: बीआरएसच्या आमदार लस्या नंदिता (Lasya Nandita) यांचा कार अपघातात मृत्यू झाला. लस्या तेलंगणातील सिकंदराबाद कँट मतदारसंघातून आमदार होत्या. सांगारेड्डीतील अमीनपूर मंडळाच्या अखत्यारीतील सुलतानपूर आऊटर रिंग रोड (ओआरआर) वर बीआरएस आमदाराच्या कारला अपघात झाला. या अपघातात मारुती सुझुकी XL6 कारचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावर आदळली. या अपघातात बीआरएसच्या आमदार लस्या नंदिता गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची जे फोटो समोर आले आहेत त्यात लस्याच्या कारचा चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे. आमदार लस्या नंदिता (Lasya Nandita) या अवघ्या ३६ वर्षांच्या होत्या. लस्या नंदिता या सायन्ना यांच्या मुलगी होत्या, जे सिकंदराबाद कँट मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले आहेत.

फेब्रुवारी २०२३ मध्ये वडिलांचे निधन झाले
लस्या नंदिताच्या वडिलांचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झाले होते. यानंतर तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसने लस्या नंदिता यांना सिकंदराबादमधून उमेदवारी दिली आणि त्या जिंकल्या. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नंदिता यांनी भाजप उमेदवाराचा १७ हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.

काही दिवसांपूर्वीही एक अपघात झाला होता
आश्चर्याची बाब म्हणजे, याच्या काही दिवसांपूर्वीच बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा आणखी एक अपघात झाला होता. याच महिन्यात १३ फेब्रुवारीला नरकेतपल्ली येथे त्यांच्या कारला अपघात झाला होता. या रस्ता अपघातात त्या थोडक्यात बचावल्या होत्या. या अपघातात नंदिता किरकोळ जखमी झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी त्या १० दिवसांपूर्वी नालगोंडा येथे जात होत्या. यावेळी त्यांच्या कारला नलगोंडा जिल्ह्यातील नरकेतपल्ली येथे अपघात झाला, ज्यात त्यांचे गृहरक्षक जी किशोर यांचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार