भाजपा आमदार निलंबन प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून निलंबनावर प्रश्नचिन्ह

मुंबई – महाराष्ट्रात भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झालं. नागपूरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले होते. याविरोधात निलंबित आमदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

आता याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे भाजपाच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळण्याची शक्यता तयार झालीय. या याचिकेवर १८ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. आमदारांचं निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय आहे. मात्र जरी असे असले तरी देखील आमदारांचे साठ दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.