एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारातून  वगळल्याने बच्चू कडू नाराज ? 

मुंबई – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

दरम्यान,  बच्चू कडू हे बंड झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासोबत होते. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल आणि महत्त्वाचं खातं मिळेल, असं सर्वांना वाटत होतं.  मात्र, बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिंदे यांनी बच्चू कडू यांना पहिल्या विस्तारातून  वगळल्याने बच्चू कडू अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे.

मलाईदार खातं नाही, कॅबिनेटही नाही अन् राज्यमंत्रीपदही न मिळाल्याने  बच्चू कडू यांची नाराजी वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, नाराजीच्या या वृत्ताचे बच्चू कडू यांनी खंडन केले आहे.