भाजपवर टीका करण्याआधी बुडाखाली असलेला अंधार बघा- बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर

मुंबई – उद्धव ठाकरे जी तीन वर्षांपूर्वी तुम्ही महाविकास आघाडी घरात घुसवून घेतली होती. याचा तुम्हाला विसर पडला काय? ज्यांना आज तुम्ही बाजारबुणगे म्हणत आहात कधीकाळी त्यांच्याच जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात. अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले हे विसरू नका. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवता आलं नाही आणि पक्षप्रमुख म्हणून पक्षही सांभाळता आला नाही.तुम्हाला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून तुमचे उरलेले साथीदारही तुमची साथ सोडत आहेत आणि येत्या काळातही लोक तुम्हाला सोडून जाणार आहेत. त्यामुळे भाजपवर टीका करण्याआधी बुडाखाली असलेला अंधार बघा. असं देखील ते म्हणाले.