Mahadev Jankar | भाजपनं मला धोका दिला, मी सुरवात केल्यास सरकार राहणार नाही, महादेव जानकर यांचा इशारा

Mahadev Jankar | लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीत मतभेद वाढत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटातील रामदास कदम यांनी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून भाजपात आलोय. आमचा विश्वासघात करू नका, असे म्हणत भाजपाला इशारा दिला होता. यानंतर आता रासपचे प्रमुख महादेव यांनी भाजपाला इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीत जानकर (Mahadev Jankar) यांना स्थान दिले जात नसल्याने ते नाराज आहेत.

परभणीत (Parbhani) रासपच्या लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात बोलताना महादेव जानकर म्हणाले, भाजपने माझ्यासोबत आतापर्यंत धोका केला, मात्र मी इमानदारीने त्यांच्यासोबत राहिलो. मी ज्या दिवशी त्यांना धोका देईल त्या दिवशी यांचं सरकार राहणार नाही. गोपीनाथ मुंडे गेल्याने पंकजा पेक्षा जास्त माझी वाताहत झाली असल्याची खंत महादेव जानकर यांनी बोलून दाखवली.

मला मुख्यमंत्री नाही व्हायचं, पाच मिनिटं का होईना मला पंतप्रधान व्हायचंय असे म्हणत पुन्हा एकदा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजप वर (BJP) हल्लाबोल केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य