भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, मुंबईतील शिवसेनेची ताकद नष्ट करायची आहे – राऊत

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे.एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून गेली आधीच वर्षातील मागील सरकारचा कारभार पाहता या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, या बंडामुळे शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची टीका-टिपण्णी सुरुच असल्याचे दिसत आहे. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईतील शिवसेनेची ताकद नष्ट करायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदुक ठेवली आहे. मुंबईत शिवसनेनेचाच पराभव करण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आहे. जनतेला भ्रमिष्ट करणं ही भाजपची रणनीती आहे आणि शिंदेही आता याच मार्गाने जात आहेत, असं राऊत म्हणाले.

‘एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर पक्षाची शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सहीने ही कारवाई झाली आहे. आता ते शिवसेनेचे नेते नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारानुसार कारवाई केली आहे, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी त्या पत्राबद्दल स्पष्ट खुलासा केला आहे.