वंचित समाजाचे प्रश्न भाजपा सोडविणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

Chandrashekhar Bawankule: वंचित समाजाचे (Vanchit Samaj) विकासाचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सोडवेल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय भोसले (Sanjay Bhosale) यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, प्रवक्ते असिफ भामला, पंडित राठोड आदी उपस्थित होते. भोसले यांच्या बरोबर राज्यातील घडशी समाज तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भोसले यांचे स्वागत करत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अनेक वर्षे काम केले असून त्यांनी दक्षिण मध्य मुंबईमधून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती.
बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे . पंतप्रधान मोदी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओढा भाजपाकडे वाढला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून वंचित समाजाचे प्रश्न मार्गी लावले जातील तसेच घडशी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल असेही बावनकुळे यांनी नमुद केलं.

वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री.भोसले यांनी यावेळी सांगितले . विरोधी पक्षीयांनी भाजपा बद्दल पसरवलेले गैरसमज दूर करण्याचा तसेच मोदी सरकार व महायुती सरकारच्या योजना दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असेही भोसले यांनी सांगितले.

भोसले यांच्या बरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये गोरख उबाळे, पंकज चाबुकस्वार, सुजाता कांबळे, संगीता शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे किसनराव हंडाळ, राज्य घडशी समाजाचे कार्याध्यक्ष शिवाजी कदम, पुणे जिल्हाध्यक्ष घनश्याम मोरे, अशोक काळे, सुनील वाडेकर, दयानंद खरात, किरण यादव, ऋषिकेश घाडगे आदींचा समावेश आहे.

https://youtu.be/RsojeTFHYGA?si=e0btub7fBGH2dCiM

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलंस..! नुकताच बाप बनलेल्या बुमराहला पाकिस्तानी गोलंदाज आफ्रिदीने दिली खास भेट

नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”, Rohit Sharmaचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा

विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज