अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या पुस्तकाचे सोमवारी पुण्यात प्रकाशन

पुणे – अमित शाह आणि भाजप ची वाटचाल या ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर यांनी मराठीत अनुवादीत केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा (Book Release Ceremony) येत्या सोमवारी 16 मे रोजी सायंकाळी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) व संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.

सदर कार्यक्रमांस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खा. प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar), खा. गिरीश बापट (Girish Bapat) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. मूळ पुस्तक अनिर्बन गांगुली आणि शिवानंद द्विवेदी यांनी लिहिले असून शिवानंद द्विवेदी खास दिल्लीहून या प्रकाशन सोहोळयासाठी येत आहेत.

स्मृती इराणी दीर्घ काळानंतर पुण्यात येत असून यनिमित्ताने पुणेकरांना त्यांना ऐकण्याची संधी उपलब्ध होत आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी सायंकाळी 5:30 पूर्वी बाल गंधर्व रंगमंदिरात उपस्थित रहावे असे आवाहन ही जगदीश मुळीक यांनी केले आहे.