औरंगाबादचे  संभाजीनगर नामांतर करायची गरज काय ? उद्धव ठाकरेंचा अजब सवाल

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान,  सभेत त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर देखील भाष्य केलं. संभाजीनगर नामांतर करायची गरज काय ? आहेच तेे संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे. असं ते म्हणाले. ओवेसी येऊन गेला. तिथे औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवलं. यांच्या ए टीम बी टीम पाठवल्या जात आहे. कुणाच्या हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) देणार आणि हे मजा बघत बसणार आहे. आम्ही मग काय टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेण्यासाठी बसलो आहोत का?  असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी भाजपला (BJP) लगावला.