चाळीस वर्षीय मामीचा १६ वर्षांच्या भाच्यावर लैंगिक अत्याचार, मुंबईत मामाकडे आला होता राहायला

Women Sexually Abused 16 Year Boy: मामाच्या घरी राहायला आलेल्या १६ वर्षीय भाच्यावर ४० वर्षीय मामीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी विकृत मामीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

१६ वर्षांच्या मुलाला फिट येण्याचा त्रास आहे. त्यावर उपचारासाठी तो उत्तर प्रदेशातून मामाकडे मुंबईत आला होता. पण मुंबईत मामीने लैंगिक अत्याचार केल्यानं तो एप्रिलला गावी परतला. दोन महिन्यांपूर्वी मामीने गावच्या जमिनीच्या वादातून ताडदेव पोलीसात मुलाविरुद्ध अश्लील वर्तन केल्याचा आरोप करत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाला उत्तर प्रदेशातून अटक केली. मामीने मुलाचे वय २० वर्षे असल्याचंही सांगितलं.

मामीने भाच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर आता आईने मामीविरोधात तक्रार दिलीय. मामीची वाईट नजर मुलावर होती आणि त्याला मारहाण करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. आईच्या तक्रारीनंतर मामीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मुलाच्या आईने पोलिसांवरही आरोप करताना म्हटलं की, कोणतीही खातरजमा न करता मुलाला अटक करण्यात आली. मुलगा अल्पवयीन असल्याचे पुरावे दिले तरीही अटक केली गेली. त्याला आता बालसुधारगृहात ठेवलं आहे. ज्याच्यावर अत्याचार झाला त्यालाच शिक्षा दिलीय. माझा मुलगा निर्दोष आहे. दरम्यान, या प्रकारावर ताडदेव पोलीस ठाण्याकडून प्रतिक्रिया दिली गेली नाहीय.