Budget 2023 : जाणून घ्या बजेटमधील 10 मोठ्या गोष्टी फक्त एका क्लिकवर

Budget 2023 Live Updates : मोदी सरकारने गरिबांसाठी कल्याणकारी योजना असलेल्या ‘अंत्योदय योजने’चा कालावधी आणखी एक वर्ष वाढवला आहे. बुधवारी 2023 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या काही महत्वाच्या मोठ्या घोषणा जाणून घेऊया.

करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. म्हणजेच सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. सरकारने टॅक्स स्लॅब वाढवला तर करदाते वाचणाऱ्या पैशातून खरेदीकडे, गुंतवणुकीकडे वळतील. याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, तरुण उद्योजकांच्या कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड स्थापन केला जाईल. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावरही लक्ष दिले जाणार असून त्यासाठी कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

2023 च्या अर्थसंकल्पात पीएमपीबीटीजी विकास अभियान सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. ही घोषणा विशेषतः आदिवासी गटांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करण्यात आली आहे, जेणेकरून PBTG वसाहतींना मूलभूत सुविधा पुरवल्या जाऊ शकतील. यासाठी 15,000 कोटी रुपये सरकार उपलब्ध करून देणार आहे.

याशिवाय, शिक्षण क्षेत्रात घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, बाल आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. पारंपारिक कारागीर आणि कारागीरांसाठी पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान पॅकेजची कल्पना करण्यात आली आहे, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या. हे एमएसएमईंना त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, प्रमाण आणि पोहोच सुधारण्यास सक्षम करेल आणि मूल्य शृंखलेशी एकरूप होईल.

38,000 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांचीही तीन वर्षांत भरती केली जाईल. ही भरती 740 LVYA निवासी शाळांमध्ये केली जाईल. ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाख करण्यात येईल. महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येईल. 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.