स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे आरके षणमुखम चेट्टी कोण होते?

Who was RK Shanmukham Chetty Presented first budget of independent India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. त्या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का देशाचा पहिला अर्थसंकल्प स्वातंत्र्यानंतर कधी मांडला गेला आणि कोणी सादर केला? स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थमंत्र्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सन 1947 मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आरके षण्मुखम चेट्टी यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला. ते स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते.

आरके षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 या साडेसात महिन्यांसाठी होता. 1892 मध्ये जन्मलेले षण्मुखम चेट्टी अर्थमंत्री होण्यापूर्वी व्यापारी होते. ते कोचीनचे दिवाण होते. चेट्टी हे चेंबर ऑफ प्रिन्सेसचे घटनात्मक सल्लागार होते.

आरके षण्मुखम चेट्टी यांचे शिक्षण मद्रास ख्रिश्चन कॉलेज आणि मद्रास लॉ कॉलेजमध्ये झाले. ते प्रो-ब्रिटिश जस्टिस पार्टीचे सदस्यही होते. षण्मुखम चेट्टी हे 1933 ते 1935 पर्यंत भारताच्या सेंट्रल असेंब्लीचे स्पीकर देखील होते. ते वकील आणि राजकारणी होते आणि अर्थशास्त्रावरही त्यांचे चांगले प्रभुत्व होते. 1947 ते 1949 या काळात ते भारताचे अर्थमंत्री होते. 5 मे 1953 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी स्वतःला खूप भाग्यवान असल्याचे सांगून हा ऐतिहासिक प्रसंग म्हणून स्मरणात राहील असे सांगितले होते. त्यांनी बजेटची कागदपत्रे ब्रीफकेसमध्ये आणली होती. यावेळी त्यांनी पांढरा शर्ट आणि काळा सूट घातला होता. त्यांनी टायही घातला होता. स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पात एकूण महसुलाचा अंदाज 171.15 कोटी रुपये होता.

महत्वाच्या बातम्या-

‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’, सावरकरांच्या पुस्तकाने मोठी खळबळ

शपथपत्र देऊन जात बदलता येते का? मंत्री छगन भुजबळ यांचा थेट सवाल

ओबीसी समाजावर मोठे संकट, मात्र भुजबळांच्या नेतृत्वात मोठी चळवळ उभी करणार – गोपीचंद पडळकर