Rajya Sabha Election | काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या ‘त्या’ नेत्याला लागणार राज्यसभेची लॉटरी?

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या देशभरातील 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यासाठी उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमधे राज्यातल्या प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), नारायण राणे (Narayan Rane), व्ही मुरलीधरन (V Muralidharan), वंदना चव्हाण (Vandana Chavan), अनिल देसाई (Anil Desai), कुमार केतकर (Kumar Ketkar), या सहा सदस्यांचा समावेश आहे. या निवडणुकीचे निकालही त्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत.

दरम्यान, राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर (Rajya Sabha Election) जाण्याची संधी मिळणार का? हा सवाल उपस्थित केला जात असताना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील याचीही चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा (Milind Deora) यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल