Vijay Thalapathy | CAA हा कायदा तमिळनाडू लागू करू नये, अभिनेता विजय थलपतीने दर्शवला विरोध

Vijay Thalapathy | लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने CAA ची अधिसूचना जारी केली आहे. आता 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळू लागेल. CAA लागू झाल्यानंतर अनेक लोक त्याचा विरोध करत आहेत. यामध्ये एक नाव आहे साऊथ स्टार थलपथी विजयचे (Vijay Thalapathy), ज्याने नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 च्या अंमलबजावणीला विरोध केला आहे आणि तामिळनाडूमध्ये हा कायदा लागू होऊ देऊ नये असे आवाहन केले आहे.

थलपथी विजय याने सीएएबाबत असे सांगितले
नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर लगेचच, थलपथी विजय याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 (CAA) सारख्या कोणत्याही कायद्याची अशा वातावरणात अंमलबजावणी करणे स्वीकार्य नाही जिथे नागरिक देश म्हणजे सर्व नागरिक सामाजिक सौहार्दाने राहतात. यासोबतच विजयने आपल्या पोस्टद्वारे तामिळनाडू सरकारला विनंती केली की, हा कायदा तामिळनाडूमध्ये लागू करू नये.

2 फेब्रुवारी रोजी थलपथी विजयने अलीकडेच अधिकृतपणे त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा केली, ज्याचे नाव आहे तमिलगा वेत्री कळझम आहे. त्याच्या राजकीय पक्षाच्या घोषणेनंतर थलपथी विजय याचे हे पहिले विधान आहे, जे सध्या चर्चेत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य