Kerala Tourism : चॅम्पियन्स बोट लीग व डेस्टिनेशन वेडिंग हे पर्यटकांना केरळकडे करत आहेत आकर्षित

Kerala Tourism : केरळने इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केरळमध्ये चॅम्पियन्स बोट लीग (सीबीएल) चे आयोजन केले जाणार आहे. ओणमच्या नेत्रदीपक सोहळ्यानंतर, या चॅम्पियन्स बोट लीग (सीबीएल) स्पर्धांच्या तिस-या पर्वाचा शुभारंभ या महिन्याच्या सुरुवातीला झाला आहे. या स्पर्धांमुळे राज्यात देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा श्री. साजेश एन., सहाय्यक. पर्यटक माहिती अधिकारी, पर्यटन विभाग, केरळ सरकार, यांनी व्यक्त केली.

पुण्यात विमान नगर येथील हॉटेलमध्ये केरळ पर्यटन विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात  साजेश एन. हे बोलत होते. केरळच्या बॅकवॉटर्स क्षेत्रात सर्वत्र भरविल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स बोट लीग स्पर्धा नेत्रदीपक दृश्यांचा एक दुर्लभ नजराणा प्रेक्षकांसमोर खुला करतात, जिथे अनेक नावाड्यांच्या वल्हवण्याची ताकद घेऊन चालणाऱ्या भव्य स्नेक बोट्स (चुंदन वल्लम) पाचूसारख्या लकाकणाऱ्या बॅकवॉटर्समधून पुढे जाताना उत्साहाची सळसळणारी लाट निर्माण करतात. राज्यभरात सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या ओणमच्या आठवड्यातील उत्सवानंतर लगेचच सुरू होणारा चॅम्पियन्स बोट लीगचा मोसम म्हणजे पर्यटकांसाठी केरळला भेट देण्यासाठीचा आणि इथल्या वैविध्यपूर्ण आकर्षणांचा आनंद अनुभवण्यासाठीचा एक मनोरम काळ असतो, असे  साजेश एन.म्हणाले.

साजेश एन. यांनी माहिती दिली की अलीकडचा काळात केरळ हे एक लोकप्रिय डेस्टिनेशन वेडिंग स्थळ (Popular destination wedding venue) बनल्याचे दिसत आहे.कारण केरळचे असाधारण निसर्गसौंदर्य, इथली नयनरम्य ठिकाणे, राहण्याची अत्युत्तम सोय आणि बॅन्क्वे सुविधा तसेच कनेक्टिव्हिटी यांमुळे हे जगातील काही सर्वोत्तम वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक स्थळ बनले आहे. दाट वृक्षांची झालर, अद्भुत शांततेने नटलेली बॅकवॉटर्स, रमणीय समुद्रकिनारे आणि सर्वत्र पसरलेल्या चहाच्या मळ्यांमध्ये दडलेली गूढ हिल स्टेशन्स यांच्यामुळे हे राज्य डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे आदर्श ठिकाण बनले आहे.

साजेश एन. पुढे म्हणाले की, केरळच्या हाऊसबोट्स, कारव्हॅनमधील वास्तव्य, जंगलनिवास, चहामळ्यांची सफर, होम स्टे सुविधा, आयुर्वेदावर आधारित स्वास्थ्य सेवा, गावकुसातून फेरफटका (Kerala Houseboats, Caravan Stays, Jungle Stays, Tea Estate Tours, Home Stay Facilities, Ayurveda Based Healthcare, Village Tours) आणि हिरवाईने नटलेल्या टेकड्यांमधील गिर्यारोहणासारखे साहसी उपक्रम यामुळे ही सहल इथे येणाऱ्या पाहुण्यांना एक आगळावेगळा अनुभव देणारी एक अस्सल आनंदयात्रा ठरेल.

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil