चमत्कार! समुद्रात बुडालेल्या १३ वर्षीय मुलाला गणपती बाप्पांनी वाचवलं, २४ तासांनी असा सापडला जिवंत

Ganesh Visarjan: गणेश विसर्जनावेळी नदीत आणि समद्रात बुडून काही जणांचे जीव गेल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. मात्र सुरत येथे गणपती विसर्जनावेळी समुद्रात बुडालेल्या एका मुलाला बाप्पाने वाचवले आहे. होय… हे अगदी खरे आहे? ते कसे बातमी वाचून समजून घ्या.

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ सप्टेंबरला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सुरत शहरातील डुम्मस बीचवर कुटुंबासह फिरायला गेलेला लखन देवीपूजक नावाचा १३ वर्षीय मुलगा समुद्रात आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान तो लाटांमुळे बुडाला. समुद्रकिनारी उभं राहून त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर लोक इच्छा असूनही त्याला मदत करू शकले नाहीत. त्याच्या शोधासाठी  सुरत पोलिस प्रशासनाने गोताखोर आणि अग्निशमन दलाची मदत घेतली होती. मात्र काहीही उपयोग झाला नाही.

अखेर २४ तास उलटल्यानंतर समजले की, गणेशाच्या मूर्तीने लखनला समुद्राच्या खोल पाण्यात बुडण्यापासून वाचण्यास मदत केली. कारण, लखनला गणेश मूर्तीच्या खालच्या भागाचा आधार मिळाला आणि तो २४ तासांपेक्षा जास्त काळ त्यात बसून तरंगत राहिला. समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या भवानी बट येथील मच्छीमारांनी मुलाला पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला आपल्या बोटीत बसवले. त्यानंतर मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या बिंदू बेन यांना याबाबत माहिती दिली. बिंदू बेन यांनी सुरतच्या सागरी पोलिस स्टेशन आणि डुम्मस पोलिस स्टेशन प्रशासनाला माहिती दिली होती. त्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil