‘4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार’

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा आज पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे  सर्वांचे लक्ष होते. यावेळी त्यांनी  भोंग्यांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली.

4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही.  4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे. लाऊडस्पीकरचा हा मुद्दा जुना आहे.  माझ्याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे. मी मशिदीवरच्या भोंग्याला हनुमान चालीसाचा फक्त त्याला पर्याय दिला आहे. मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. सरळ मार्गाने समजत नसेल तर मग महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद दाखवण्याची वेळ आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

शरद पवारांवर हल्लाबोल

शरद पवार सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे.शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग फोटो यायला लागले. सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत.

राष्ट्रवादीच्या  सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही नसायचा. शरद पवार साहेब मी जात मानत नाही. कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही आणि कोणाचीच बाजू घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या अठरापगड जातींमध्ये तुम्ही विष कालवले. मतांसाठी कालवले विष शाळा कॉलेजपर्यंत गेले आहे. शाळेत मुले एकमेकांच्या जातीविषयी विचार करु लागली आहेत. यासाठी महाराष्ट्र दिवस साजरा करायचा का?

पवार साहेबांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे पण त्याआधी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचा. मी सर्व वाचलंय. ते सर्व वाचलं तर ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही. हिंदू धर्माची पूजा करणारा माणूस होता तो. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारा व्यक्ती होता. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होता.असं ते म्हणाले.