Chandrahar Patil | साहेब तुम्हाला वचन देतो, महाराष्ट्रात सगळ्यात पहिला निकाल सांगलीतून येईल; चंद्रहार पाटलांनी भरली हुंकार

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil : आज शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवा ‘वजनदार’ नेता मिळाला आहे. महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब मिळविलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर मशाल हाती घेत ते शिवसेना ठाकरे गटात सामील झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले.

ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आज मला मनापासून आभार मानायचे आहेत की, एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारले. तुम्ही मला सांगली लोकसभेच्यादृष्टीने जो मान दिला, त्यासाठी मी आभारी आहे. तुम्ही एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करुन दाखवण्याची सवय आहे. महाराष्ट्रातील पहिला निकाल सांगलीतून असेल, एवढे वचन मी तुम्हाला देतो, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य