chandrakant Patil | महाराष्ट्रात असा नेता जन्मलाय, ज्याने भल्या भल्यांची झोप उडवली, चंद्रकांत पाटलांनी कुणाचं एवढं कौतुक केलं

chandrakant Patil | पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्लस्टरचे प्रमुख म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीतील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांसह बैठक घेणार आहेत. त्यानुसार रविवारी बारामती मतदारसंघाची बैठक पार पडली असून आज पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाची बैठक पार पडत आहे. या बैठकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांचे संवाद सादर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरती स्तुती सुमन उधळली.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणले, पुणे लोकसभेबाबत विरोधक अस पर्सेपन्शन तयार करतायत की ही सीट भाजपसाठी अवघड आहे. पण आमचे पुण्यातील मताधिक्य मागीलवेळी पेक्षा वाढेल. मागील वेळी आम्हाला सहा लाख 31 लाख मते मिळाली होती. आता आमच्यासोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांची मते आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सेनेची एक लाख मते कमी झाली तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दीड लाख मते वाढणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या उमेदवाराने विचार करून उभे रहावे असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

विरोधक इलेक्ट्रॉल बॉण्ड मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करत असले तरी प्रत्यक्षात इलेक्ट्रॉल बॉन्डचा कोणताही घोटाळा झालेला नाही. सगळेच पेसे चेकने आलेत. त्यामुळे विरोधकांनी किती आरोप केले तरी महाराष्ट्रातील जनतेला मूळ वास्तव माहिती असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

भाजपाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची चाचपणी सुरू असून आत्तापर्यंत तीन उमेदवारांबाबत भाजपकडून विचार करण्यात आला आहे. सोलापूर मध्ये सारं काही अलबेला नसल्याने वेगवेगळ्या उमेदवारांची चाचणी फडणवीस स्वतः करत आहेत का? याबाबत विचारला असता पाटील म्हणाले, महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस हे असे नेते जन्माला आले आहेत. ज्यांनी भल्या भल्या नेत्यांची झोप उडवली आहे. फडणवीस प्रतेक गोष्ट तावून सुलाखून घेतात. त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे सोलापूरच्या निवडणुकीला अद्याप खूप अवधी असून फडणवीस तावून सुलाखून उमेदवार देतील.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका