Raj Thackeray | राज ठाकरे अमित शाह यांची भेट घेणार, मनसेच्या महायुतीत सहभागी होण्यावर चर्चा होणार

Raj Thackeray | लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी राज्यात आणखी एका पक्षाची युती पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे भाजपाशी हात मिळवू शकते, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचल्याने या चर्चांनी जोर धरला आहे.

दिल्लीतील बैठकीला राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत. आजच्या बैठकीत मनसेच्या महायुतीत सहभागी होण्यावर चर्चा होणार असल्याचे समजत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार मनसे दोन लोकसभेच्या जागा लढण्यासाठी आग्रही आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका