‘हिंदुची आणि हिंदू देवी देवतांची कोणीही थट्टा करो.. उबाटा बर्फासारखी थंड आहे’

Jitendra Aavhad On ShriRam – माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने करत असतात. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले होते या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलत असताना एक वादग्रस्त विधान केले आहे.

राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला.

दरम्यान, या वक्तव्यानंतर आव्हाड यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गट सुद्धा अडचणीत आला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, जर आज स्वर्गीय बाळासाहेब असते तर आजच्या सामना मधून प्रभू रामचंद्रा ना मांसाहारी बोलणाऱ्यांना कडक शब्दात सुनावले असते. त्याच्यावर तुटून पडले असते.. प्रहार केला असता.मात्र . आज काय स्तिथी आहे पहा उबाटाला प्रभू रामला कोणी काही म्हणो त्यांना काही पडले नाही.

हिंदुची आणि हिंदू देवी देवतांची कोणीही थट्टा करो.. उबाटा बरफा सारखी थंड…त्यांना काहीही फर्क नाही पडत.. म्हणे काय तर.. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही.. वा रे वा.. तुम्हाला तर फक्त स्वतःची घरं भरायला.. मतदानाची वेळ आली की हिंदुत्व आठवते..उन्हे केवल वोट की ओछी राजनीत करनी हैं.. असे म्हणत कदम यांनी ठाकरे गटाला फटकारले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात