गायीच्या पोटाला हे मोठे छिद्र पाहून आश्चर्य वाटले ना ? हे आहे कारण …

अमेरिकेत गायीच्या पोटाला हे जे छिद्र पाडले जाते, त्याला वैज्ञानिक भाषेत ’कॅनूला’ असे म्हणतात. भारतात हा प्रकार बघायला मिळत नसल्याने, आपल्याला असे काही पाहिले की जाम आश्चर्य वाटते. मात्र फक्त अमेरिकाच नाही, तर इतरही अनेक पाश्चात्य देशात ही प्रक्रिया पार पाडली जाते.

US Farmers Are Making These Giant Holes in Their Cows. The Reason? Weird  Yet Helpful

असे म्हणतात, की १९२० सालापासून ह्या प्रकारच्या प्रयोगाची सुरुवात झाली. संशोधकांनी गायीच्या पचनसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी गायीच्या पोटाला एक छिद्र पाडले. पचनसंस्थेच्या अभ्यासाबरोबरच गायीच्या पोटातील अंतर्गत स्वच्छतेसाठी देखील ह्या छिद्राचा खूप छान उपयोग होऊ शकतो . हे लवकरच लक्षात आले, आणि मग ही पद्धत रूढ व्हायला सुरूवात झाली. ह्या छिद्राने गायीच्या आरोग्यावरती काहीही परिणाम होत नाही, तसेच तिचे जीवनचक्र देखील नैसर्गिक प्रकारेच कार्यरत राहते हे विशेष.