सोनिया गांधींना राहुल, शरद पवार यांना सुप्रिया तर उद्धव ठाकरेंना आदित्यच्या भविष्याची चिंता

मुंबई – विरोधकांच्या बैठकीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची ट्विट करत टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत, असं बावनकुळे यांनी म्हटले आहे.

मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आलेत. एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार (Sharad Pawar) यांना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आदित्य ठाकरेंचं (Aditya Thackeray) भविष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत.

देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं आता २०२४ मध्येही जनता मोदीजींची साथ देणार आहे.अशी टीका त्यांनी केली आहे.