उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय- चंद्रकांत पाटील

पुणे – दहीहंडीचा (Dahihandi) क्रीडा प्रकारात समावेश करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी (18 ऑगस्ट) विधानसभेत केली आहे. तसंच दहीहंडीत सहभाग नोंदवणाऱ्या गोविंदांना क्रीडा कोट्याच्या 5 टक्के आरक्षणाचा लाभही मिळेल, अशी घोषणा शिंदे यांनी केली. पण याच घोषणेवरून वादंग सुरू होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाविरुद्ध परीक्षार्थी संघटना आक्रमक होत असून त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पुण्यात बोलताना दहीहंडी खेळाबाबत स्पष्टीकरण दिलंय. आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहांडी खेळ नव्याने अॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही (Mangalagaur-Viti Dandu) मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय? असा सवाल त्यांनी केलाय.

एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू केलं जातं आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा (Reservation) कायदा आहे. खेळामधील 5 टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना आहे. आधी जे खेळ यात होते त्यात हा एक खेळ जोडला गेला आहे. त्यात कुठलही अधिकच आरक्षण दिलं नाही. फक्त नवा खेळ जोडला आहे. तशी कुणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कुणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू , असंही चंद्रकांत पाचील म्हणाले आहेत.