Dahi Handi 2022 : ‘विधानसभेत मी म्याव म्याव आवाज काढला तर काय अवस्था झाली, हे महाराष्ट्राने पाहिली, उगाच…’

मुंबई : दहीहंडीच्या (Dahi Handi 2022) निमित्ताने मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना (BJP vs Shivsena) यांच्यात राजकीय सामना रंगला. वरळीच्या जांभोरी मैदानातल्या या दहीहंडीमध्ये भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हजेरी लावली. दहीहंडीच्या व्यासपीठावरून नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.

‘वरळीमध्ये भाजपलं कोणी आव्हान द्यायचा प्रयत्न करू नये. वरळी हा त्यांचा गड आहे, पण प्रत्येकाचा गड कसा सर करायचा आणि प्रत्येकाला भायखळ्याच्या पेंग्विन पार्कमध्ये कसं पाठवायचं, हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे,’ असं नितेश राणे म्हणाले.

‘विधानसभेत मी म्याव म्याव आवाज काढला तर काय अवस्था झाली, हे महाराष्ट्राने पाहिली, उगाच डरकाळी फोडण्याचा प्रयत्न कुणी करू नये, मुंबई कुणाच्या साहेबांची नाही. मुंबई तुमच्यासारख्या असंख्य मुंबईकरांची आहे,’ असं नितेश राणे म्हणाले.