तरुणाई अंथरुणात शिरून तिचे फोटो बघते, चूक तिची…; चेतन भगत आणि उर्फी जावेद आमनेसामने

Urfi Javed vs Chetan Bhagat: ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद हिला आता वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. उर्फी जावेद आणि चेतन भगत यांच्यात सध्या शब्दांची लढाई सुरू आहे. प्रथम चेतन भगतने उर्फीवर भाष्य केले. त्यानंतर उर्फी चेतन भगतवर भडकली. आता चेतन भगतने उर्फीबाबत एक नवीन ट्विट केले आहे.

चेतन भगतने ट्विट करून लिहिले की, मी कधीच कोणाशी बोललो नाही. ना भेटलो ना ओळख बनवली. मी हे केले असे जे काही बोलले जात आहे. ते खोटे आहे. या प्रकरणाचा प्रचार करणे योग्य नाही. मी कधीही कोणावर टीका केली नाही. इन्स्टाग्रामवर वेळ वाया घालवण्याऐवजी फिटनेस आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकांना सल्ला देऊन मी चुकीचे केले आहे, असे मला वाटत नाही. मात्र, या ट्विटमध्ये चेतन भगतने उर्फी जावेदच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

उर्फी जावेद काय म्हणाली?
चेतन भगतच्या कमेंटला उत्तर देताना उर्फीने पापाराझीला सांगितले की, चेतन भगत जेव्हा अभिनेत्रीबद्दल बोलत होता तेव्हा तो काय विचार करत होता हे तिला समजले नाही. एका साहित्यिक कार्यक्रमात त्याने माझ्याबद्दल बोलायला पाहिजे नव्हते.

यानंतर उर्फीने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘तुम्ही तुमच्या अर्ध्या वयाच्या मुलीला इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करत असताना तुमची दिशाभूल कोण करत होती?’ या पोस्टद्वारे उर्फीने चेतन भगतला बलात्काराला प्रोत्साहन देऊ नका असे सांगितले.

चेतन भगतने तरुणांना काय दिला सल्ला?
एका कार्यक्रमात चेतन भगतने आजच्या तरुणांना पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. तो म्हणाला की होता, इंटरनेट ही चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे आपली तरुणाई कमकुवत झाली आहे. मुलं दिवसभर फोनवर रील बघत राहतात. फोटो लाईक करत राहतात. उर्फी जावेदच्या फोटोला तरुणाई लाइक करत आहे. मला उर्फीचे सगळे कपडे माहीत आहेत. उर्फीची चूक नाही. ती तिचं करिअर घडवत आहे. लोकं अंथरुणात शिरून उर्फीचे फोटो बघत आहेत. उर्फीचे फोटो पाहून आज मी पण आलो आहे. आज तिने दोन फोन घातले आहेत. उर्फी जावेदसारखे लोक भेटत राहतात असेही चेतन भगत म्हणाला.