Chitra wagh | …स्क्रीप्ट लिहिणारे पाताळयंत्री शकुनीमामा लवकरच जनतेसमोर उघडे पडतील

Chitra wagh – ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट टीका केली. जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेनंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करताना अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरली होती.

हि टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख केल्याने तसेच राजकीय स्वरूपाचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरांगे यांनी फडणवीस यांना शिवीगाळ देखील केल्याने उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. यातच आता भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांची देखील प्रतिक्रिया आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मराठा आरक्षणासारख्या (Maratha Reservation) सामाजिक मागणीच्या पूर्ततेसाठी काल-परवापर्यंत शांततामय मार्गाने चालणारे या आंदोलनाचे नेते अचानक हिंसक, चिथावणीखोर आणि पूर्णतः राजकीय स्क्रीप्ट वाचू लागल्यानंतर या प्रकाराची सखोल चौकशी होणं गरजेचं होतं असं त्यांनी म्हटले आहे. एसआयटीमार्फत तशा चौकशीचे आदेश देण्याचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय अतिशय योग्य आहे. राज्याची कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा बिघडवू पाहणारी ही स्क्रीप्ट लिहिणारे पाताळयंत्री शकुनीमामा लवकरच जनतेसमोर उघडे पडतील अशी अपेक्षा आहे… राजकीय मतलबासाठी अख्ख्या समाजालाच वेठीस धरून राज्य अस्थिर करू पाहणाऱ्यांची सरकारने अजिबात गय करू नये असे वाघ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी