‘माझ्या नवऱ्याची एक भानगड काढून दाखवा, शंभर भानगडी काढेन’; चित्रा वाघ यांचे गृहराज्यमंत्र्यांना आव्हान

कोल्हापूर – नाशिकच्या वाघांच्या अनेक भानगडी आहेत असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी वक्तव्य केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर वाघांची एक भानगड काढून दाखवा, तुमच्या भानगडींचे व्हॉल्यूम निघतील असं भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, निवडणूक (Election) आहे, विकासावर बोला. माझ्या नवऱ्याची एकही भानगड काढून दाखवा मी तुमच्या भानगडींचे व्हॉल्यूम काढून दाखवेन. आता बोलणार नाही, वेळ आली तर करुन दाखवेन. मी एक बाई आहे म्हणून दुसऱ्या बाईबद्दल म्हणजे तुमच्या बायकोबद्दल बोलणार नाही.

जेव्हा राजकारणातील मुद्दे संपतात त्यावेळी वैयक्तीक टीका केली जाते असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. पालकमंत्री म्हणता म्हणता बाबा मालकच झाला कोल्हापूरचा असाही टोला चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांना लगावला आहे. सत्तेची मग्रुरी ही गुंडांवरती दाखवा, त्या बलात्काऱ्यांवरती दाखवा असंही आव्हान त्यांनी दिलं आहे. ABP माझाने याबाबत वृत्त दिले आहे.