नवनीत राणांच्या भेटीनंतर चित्रा वाघांचं ट्विट, रावणाचं नाव घेत ठाकरे सरकारवर टीका

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa recitation) करण्यावरून झालेल्या राजकीय रणधुमाळीनंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होता. राणा दाम्पत्याची जामीनावर सुटका झाली आहे. नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल आहेत.

दरम्यान शुक्रवारी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी लिलावती रुग्णालायस भेट देऊन खा. नवनीत राणा यांच्या तब्बेतीची विचारपुस केली. या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत महाआघाडी सरकारवर (MVA Government) टिका करत सदर भेटीचे फोटो समाजमाध्यमातून शेअर केले. सोबतच आपला संताप देखील व्यक्त केला आहे.

यावेळी ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी लिहले आहे, खासदार नवनीत राणा यांची आज लीलावती इस्पितळात भेट घेतली. एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला. हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल. नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत, हे सरकार ने विसरू नये.