Sanatan Dharmaची HIV बरोबर तुलना, उदयनिधीनंतर आणखी एका नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत

Sanatana Dharma Controversy:  तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.’ असे म्हटले होते.

उदयनिधीनंतर आता डीएमके खासदार ए. राजा यांनी, सनातन धर्माची तुलना HIV बरोबर केली आहे, ज्यामुळे आता मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.

उदयनिधी या संपूर्ण वादावर जे काही बोलले, ते फार कमी आहे. त्यांनी फक्त मलेरिया आणि डेंग्यु म्हटलं आहे. डीएमकेचे ए राजा (A Raja) यांनी सनातन धर्माचा अपमान करून त्याची तुलना एचआयव्हीशी केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार ए राजा म्हणाले की, ‘सनातन धर्म हा एक सामाजिक आजार आहे. हे कुष्ठरोग आणि एचआयव्ही पेक्षा जास्त प्राणघातक आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde