मिटकरींच्या अडचणी वाढल्या, ‘त्या’ वक्तव्याविरोधात थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे नोंदवली गेली तक्रार

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीवर  केलेला जातीयवादाचा आरोप किती अचूक आहे याचा नुकताच प्रत्यय सांगलीच्या (Sangali) सभेत आला आहे. या सभेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांची चांगलीच नौटंकी पाहायला मिळाली. नौटंकी तर ते नेहमीच करतात मात्र यावेळी त्यांनी सभेत बोलताना त्यांनी हिंदू परंपरांची (Hindu traditions) आणि पुरोहित (Priest) वर्गाची खिल्ली उडवली आहे. अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत कन्यादानाबद्दल देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती.

आता भाजपने (BJP) राष्ट्रीय महिला आयोगात (National Commission for Women) धाव घेतली आहे. भिवंडीतल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या नीता वैभव  भोईर (Nita Vaibhav Bhoir)  यांनी राष्ट्रीय महिला आयोगात मिटकरींच्या विरोधात ऑनलाईन तक्रार (Online Complaint) नोंदवली आहे. अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य हे समस्त महिला वर्गाचा अपमान करणारं आणि हिंदू धर्माची खिल्ली उडवणारं आहे. तेव्हा, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी नीता भोईर यांनी केली आहे. याशिवाय मिटकरी भाषण करत असताना पाठीमागे बसलेले मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हे हसून त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत होते. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अमोल मिटकरींचं वक्तव्य हिंदूंच्या आणि महिला वर्गाच्या भावना दुखावणार असून त्यांच्या IPC च्या कलम 354 आणि कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी नीता भोईर यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात मिटकरी, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अडचणी वाढू शकतात.