लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसचे आज त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. पुण्यातून बहुचर्चित नाव अर्थातच रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण ७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ 7 उमेदवारांची नावे जाहीर

  1. सोलापूर – प्रणिती शिंदे
  2. कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
  3. पुणे – रवींद्र धंगेकर
  4. नंदुरबार – गोवाल पाडवी
  5. अमरावती – वळवंत वानखेडे
  6. लातूर – डॉ. शिवाजी कलगे
  7. नांदेड – वसंतराव चव्हाण