Atul Bhatkhalkar | नेहरुंची मानसिकता तरी काय वेगळी होती? कंगनावरील टिके नंतर भातखळकर आक्रमक 

Atul Bhatkhalkar | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिची हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी केली आहे. कंगनाच्या नावाच्या घोषणेवर अनेकांची मते समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट (Supriya Shrinet) यांनी कंगनाबद्दल अभद्र टिपण्णी केली आहे, ज्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

आता भारतीय जनता पक्ष कंगनाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर हल्लाबोल करत आहे. वाढता वाद पाहून सुप्रिया यांनी ती पोस्ट डिलीट केली, मात्र भाजप नेते स्क्रिनशॉटच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला करत आहेत. सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाला मंडीतून तिकीट मिळाल्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. कंगनाचा बिकीनीतील फोटो टाकत सुप्रिया यांनी लिहिले, बाजारात आज काय भाव सुरु आहे हे कोणी सांगू शकेल का?  सुप्रियाने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती.

दरम्यान, या टिकेनंतर नवा वाद निर्माण झाला असून भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी कॉंग्रेसवर टीका केली ते म्हणाले, कांग्रेसची वैचारीक पातळी किती खालावलेली आहे हे दाखवण्याचे काम सुप्रिया श्रीनेत्र या बाईने केलंय…सोनिया आणि राहुल यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसकडून दुसरी काय अपेक्षा करणार म्हणा. नेहरुंची मानसिकता तरी काय वेगळी होती? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय