Nitin Gadkari: तर ५ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, नितीन गडकरींना १०१% खात्री

Nitin Gadkari: महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील तिसर्‍या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथे मतदान होत आहे. दरम्यान केंद्रिय मंत्री आणि नागपूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आपण चांगल्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकणार याची १०१% खात्री असल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.

यंदा ७५ टक्के मतदान झाल्यास आपण ५ लाखांच्या जास्त मतांनी विजयी होऊ, असा विश्वासही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. तसेच आज लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये मतदानाचं कर्तव्य प्रत्येकाने बजावलं पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांच्या विरूद्ध मविआ चे विकास ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात