इम्रान खान यांनी रॅलीत केले भारताचे कौतुक, म्हणाले…

कराची –  पाकिस्तानच्या संसदेत इम्रान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे आणि त्यांची हकालपट्टी होण्याचा धोका आहे अशा वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी भारत आणि भारताच्या  परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले.

मलाकंदमध्ये एका सभेला संबोधित करताना खान म्हणाले, मी आज भारताचे कौतुक करतो. भारताने नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राखले आहे.खान म्हणाले, भारत अमेरिकेसोबतच्या QUAD युतीचा सदस्य आहे, परंतु तरीही तो स्वत:ला तटस्थ म्हणवतो. भारत निर्बंधांना सामोरे जात असलेल्या रशियाकडून तेल आयात करत आहे.  याचे कारण भारताचे परराष्ट्र धोरण आहे.

दरम्यान, जानेवारीच्या सुरुवातीला, इम्रान खान यांनी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरभराटीसाठी भारताचे कौतुक केले होते आणि गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या धोरणांचे देखील कौतुक केले होते.