भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरून वाद; दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

नोएडा – श्वानप्रेमी (Dog Lovers) आणि सामान्य नागरिक यांच्यात नेहमीच भांडणे होत असतात. याबाबत देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथून ताजे प्रकरण समोर आले आहे. नोएडामधील एका सोसायटीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांशी वाद घालत आहेत आणि पुढे हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले.

या ठिकाणी एक महिला रस्त्यावरील कुत्र्याला खायला घालत होती तर दुसरी महिला तिला विरोध करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिलांनी एवढा गोंधळ घातला की काही वेळातच परिसरातील लोक जमा झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुत्र्यांना खायला घालण्यावरून दोन महिला आपापसात भांडताना दिसत आहेत.

ही घटना रविवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ सेक्टर-40 मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्यान आणि आवारात ठिकठिकाणी कुत्र्यांना अन्न दिले जात असून त्यामुळे उद्यानात कुत्र्यांचा वावर सुरू झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्रे कोणाच्याही घरात घुसून गोंधळ घालतात. या मुद्द्यावरून श्वानप्रेमी आणि रहिवाशांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. रविवारीही याच मुद्द्यावरून कॅम्पसमध्ये दोन पक्षांमध्ये हाणामारी झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया