‘समाजातील घटकांचा विश्वास संपादित केला असता तर एसटी कर्मचारी घरावर चालुन गेले नसते’

मुंबई – काल अमरावतीमध्ये ( Amravati ) बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशातील एकंदरीत वातावरणावर भाष्य केले आहे. आज आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीतून जावं लागत आहे. देशात एक वेगळं जातीयवादी वातावरण निर्माण केले जात आहे. असं ते म्हणाले.

हिंदू – मुस्लीम (Hindu -Muslim) करता येईल का? दलित – हिंदू करता येईल का? असं सतत काही ना काही चालू आहे. ज्या समाजातील घटकांचा विश्वास आहे त्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी केव्हाही या गोष्टींना पाठिंबा देणार नाही. जो जातीयवाद करतो जो धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करतोय अशांची संगत राष्ट्रवादी कधीही करणार नाही असा देखील दावा पवारांनी केला आहे.

दरम्यान, आता या मुद्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले असून  मनसेचे नेते योगेश चिले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पवार साहेब नेहमीच बोलतात एक आणि करतात एक. समाजातील घटकांचा विश्वास संपादित केला असता तर एसटी कर्मचारी घरावर चालुन गेले नसते, मराठ्यांना मोर्चे काढावे लागले नसते, ओबीसींची जनगणना झाली असती, मागासवर्गीयांचा अनुशेष भरून निघाला असता… यापैकी काहीही झालेल नाही… नावापुरत सर्व घटक एकत्र करायचेत बोलायच आणि कोणत्याही घटकाला न्याय न देता एकमेकांशी भिडवत रहायच हेच राष्ट्रवादीच राजकारण…असल्याचे चिले यांनी म्हटले आहे.