Crime News | हृदयद्रावक! नवजात बाळाला पाळण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवून झोपली आई, चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

Crime News : अमेरिकेतील मिसूरी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथे एका निष्पाप नवजात बाळाला आईच्या चुकीचे परिणाम भोगावे लागले. मुलाला पाळणामध्ये झोपवण्याऐवजी, आईने त्याला चालू ओव्हनमध्ये ठेवले आणि ती दुसऱ्या कामात व्यस्त झाली. यामुळे बालकाचा श्वास गुदमरला. त्यामुळे बाळ गंभीररित्या भाजले आणि मरण (Crime News) पावले. आता आईने हे जाणूनबुजून केले की खरंच तिची चूक झाली का?, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही घटना कॅन्सस शहरात घडली. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येथे राहणाऱ्या मारिया थॉमसवर (Maria Thomas) तिच्या नवजात मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी कॅन्सस सिटी पोलिसांना मारिया नावाच्या महिलेच्या मुलाचा ओव्हनमध्ये जळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा महिलेने सांगितले की, रात्री मुलाला दूध पाजल्यानंतर तिने त्याला पाळण्याजवळ झोपवण्यास सुरुवात केली. पण तिने चुकून मुलाला ओव्हनमध्ये कसे ठेवले हे माहित नाही, असे मारियाने सांगितले.

सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला समजले की तिने चुकून मुलाला ओव्हनमध्ये झोपवल्याचे तिच्या लक्षात आले. तिने त्वरित ओव्हन उघडताच त्यामध्ये मूल जळाल्याचे दिसले. तिने तात्काळ मुलाला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू गुदमरल्याने आणि भाजल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे.

‘चूक झाली, मला ते कळले नाही’

पोलिसांनी मारियाला विचारले की तू अशी चूक कशी केलीस? यावर मारिया म्हणाली की, तिच्याकडून ही चूक कशी झाली हे तिला खरंच माहीत नाही. मारियाच्या वक्तव्यावर पोलिसांचे समाधान झाले नाही. त्यानंतर तिला न्यायालयात नेण्यात आले. तिथेही महिलेने न्यायाधीशांसमोरही हेच सांगितले. सध्या महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे. शिवाय तिचा फोनही जप्त करून तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण कॅन्सस शहरात खळबळ उडाली आहे. लोकांना आश्चर्य वाटत आहे की एखादी आई आपल्या मुलाशी असे करू शकते का?

जॅक्सन काऊंटीमध्ये या महिलेविरुद्ध खटला लढणारे वकील जीन पीटर्स बेकर म्हणाले, ही एक मनाला भिडणारी घटना आहे. आईच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बाळाचा जीव गेल्याचे आम्हाला दु:ख आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी