‘शिवभोजनाच्या नावाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन’

मुंबई – राज्यात सुरु असलेल्या शिवभोजन थाळीच्या नावाखाली शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात शिवभोजन थाळी सुरु करत असल्याचा मोठा गाजावाजा केला.आता ती जागा दलालांनी घेतली आहे. या योजनेमध्ये पैसे घेऊन काम देण्यात आले. एकाच व्यक्तीच्या नावावर ही काम देण्यात आली. राज्यात एकूण 1548 केंद्र आहेत. यात अनेक ठिकाणी बोगसगिरी आहे सुरु आहे असा देखील त्यांनी आरोप केला आहे.

पोषक आहारात मोठा घोटाळा झाला आहे. परिणामी पालघरमध्ये कुपोषित तीन हजार 149 मुलं होती आणि ऑगस्टमध्ये 40 कुपोषित मुलं मिळाली आहेत. त्यातील 24 बालके मृत जन्माला आली अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

या सरकार मध्ये सगळ्यात फायद्यात अजित पवार आहेत. कारण राष्ट्रवादीच्या सर्व विभागांना सर्वात जास्त निधी मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या विभागांना 2 लाख 50 हजार 388 कोटी आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्या खालोखाल काँग्रेसला1 लाख 1 हजार 766 कोटी. ज्यांचे सर्वात जास्त आमदार आहेत त्या शिवसेनेला केवळ 54 हजार 343 कोटी रुपये मिळाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.