Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिम याच्या मेव्हण्याची यूपीमध्ये गोळी घालून हत्या, २०१६ मध्ये पळून जाऊन केले होते लग्न

Dawood Ibrahim : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील जलालाबाद येथे आलेल्या डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचा आरोप आहे. एका लग्न समारंभासाठी ते येथे आले होते. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा मेहुणा, ज्याचे नाव निहाल खान आहे, याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तो केवळ 35 वर्षांचा होता आणि आपल्या पुतण्याच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी यूपीला आला होता.

आपल्या पुतण्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला आलेला निहाल खान हा फरार दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा मेहुणा होता, अशी माहिती गुरुवारी कौटुंबिक सूत्रांनी दिली. निहाल हा जलालाबादचे चेअरमन शकील खान यांचा मेहुणा होता. निहाल 2016 मध्ये शकीलच्या भाचीसोबत पळून गेला होता, नंतर दोन्ही बाजूंमध्ये तडजोड झाली. शकीलच्या वतीने सांगण्यात आले की, “निहालचे 15 फेब्रुवारीचे विमान चुकले होते आणि तो रस्त्याने आला होता. असे दिसते की माझा भाऊ कामिल अजूनही 2016 च्या किस्स्यानंतर निहालवर रागावला होता आणि त्याला सूड घ्यायचा होता. यावरुन हे प्रकरण घडले.”

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी
लक्षात घेण्यासारखे आहे की, अलीकडेच पाकिस्तानमध्ये लपून बसलेला भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला विषबाधा झाल्याची बातमी पसरली होती. त्याला कराचीतील रुग्णालयात दाखल केल्याची बातमीही आली होती. मात्र, अशी बातमी येताच पाकिस्तानमध्ये फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब आणि गुगलच्या सेवा बंद झाल्या होत्या. दाऊद आधीच किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार