Arvind Kejriwal | मोदींनी पुतीनचा मार्ग स्विकारलाय; केजारीवालांच्या अटकेनंतर वागळे भडकले

Arvind Kejriwal | दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, मद्य धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये 338 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. यामुळे त्यांना अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

दरम्यान, या मुद्द्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. अटकेनंतर आता जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. मोदींनी पुतीनचा मार्ग स्विकारलाय. विरोधकांना तुरुंगात डांबा किंवा बरबाद करा. जनता सगळं काही उघड्या डोळ्यांनी पहातेय. तिला जाग कधी येणार? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात