दाऊद इब्राहीमची बी टीम महाराष्ट्राच्या सरकार मध्ये काम करतेय – राणे

तुळजापूर – दाऊद इब्राहीमची बी टीम महाराष्ट्राच्या सरकार मध्ये काम करतेय म्हणून नबाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही असा सनसनाटी आरोप आ निलेश राणे सोमवारी श्रीतुळजाभवानी मंदीरात देवीदर्शन घेतल्यानंतर पञकारांशी संवाद साधताना केला.

सोमवारी दुपारी बारा वाजता आ निलेश राणे कुटुंबासह तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन करुन देवीची यथासांग पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी राम विलास छञे यांनी केले.

आ निलेश राणे म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेवर महाविकासआघाडीचे आलेले संकट दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ताकद व आशिर्वाद दे असे साकडे घातल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे मराठवाडा विर्दभात सुरुवात होणाऱ्या शिवसंपर्क अभियान बाबतीत बोलताना म्हणाले की कितीही अभियान सुरु करु देत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात भाजपाचाच भगवा झेंडा फडकेल.

द कश्मीर फाईल हा चिञपट काँग्रेस ला बदनाम करण्यासाठी बनवलाचा आरोप पवार यांनी केला आहे याबाबतीत आपले मत काय असा प्रश्न केला असता शरद पवारांवर बोलण्याइतकी माझी राजकीय उंची नाही असे म्हणून या प्रश्नाला उत्तर देणे टाळले
आम्हाला महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार पाडण्यात रस नाही ते पडले तर आम्ही पर्यायी सरकार देण्यास तयार असल्याचे यावेळी म्हणाले .