Marathi Song | दोन बहिणींचं प्रेमळ नातं जपणारं ‘बहिण लाडकी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला केपी फिल्म्स प्रस्तुत गाणं प्रदर्शित

Marathi Song :  मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत विविध धाटणीची गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. मौसम इश्काचा या पहिल्याच ॲक्शन थ्रीलर गाण्याच्या यशानंतर केपी फिल्म्स आणि ८ स्टुडिओ प्रस्तुत ‘बहिण लाडकी’ हे गाणं प्रेक्षकांच्या (Marathi Song) भेटीला आलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं दोन बहिणींच्या प्रेमळ नात्याची कथा मांडणार आहे. हे गाणं अभिनेत्री समृद्धी काळे ( Samrudhdi kale) आणि बालकलाकार निहीरा गाढवे (Nihira Gadhave) या दोघींवर चित्रीत झालं आहे. प्रसिद्ध गायिका लॅरिसा अल्मेडा हीच्या सुमधूर आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन आणि संकल्पना किशन पटेल यांनी केली आहे. तर या गाण्याचे बोल समृद्धी पांडे हीने लिहीले असून प्रशांत ओहोळ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे छायाचित्रीकरण प्रदिप कुटे यांनी केले आहे. शिवाय कॅरेस डी मॉटे, सोनम शर्मा आणि हर्श पटेल या टीमने गाण्याच्या प्रोडक्शनची कामे सांभाळली.

बहिण लाडकी गाण्याचे दिग्दर्शक किशन पटेल या गाण्याविषयी सांगतात, “ बहिण लाडकी गाण्यात दोन सख्या बहिणींच्या प्रेमळ नात्याची कथा यात मांडली आहे. एक लहान बहिण असते आणि एक मोठी बहिण असते. त्यांना आई वडील नसल्याकारणाने मोठी बहिणचं लहान बहिणीची आईप्रमाणे सांभाळ करते. मायेने वाढवते. जेव्हा मोठ्या बहिणीचं लग्न ठरतं आणि ती जेव्हा सासरी जाते. तेव्हा त्या दोन्हीही बहिणी भावूक होतात. या गाण्यात त्यांच अतूट प्रेम दाखवलं आहे. तसेच आपण आपल्या ख-या आयुष्यात नाती कश्या पद्धतीने जपतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बहिण लाडकी हे गाणं आहे.”

पुढे ते गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “बहिण लाडकी या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण पुण्यातील एका खेडेगावात झालं आहे. तर हे संपूर्ण गाणं एकाच दिवसात चित्रीत झालं आहे. सोशल मीडियावर हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या गाण्याला मिळत आहे. ते पाहून फार आनंद होत आहे. केपी फिल्म्सच्या सर्वच गाण्यांवर असचं प्रेम कायम असू द्या. आम्ही अशीच नवनविन सुंदर गाणी तुमच्यासाठी घेऊन येवू.”

महत्वाच्या बातम्या-

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प – मंत्री छगन भुजबळ

Jayant Patil | निराशाजनक,नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प! जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

Interim Budget 2024 | निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे- ठाकरे