लग्नाच्या वाढदिवसाला दीपिका-रणवीर झाले रोमँटिक, किस घेतानाचा सुंदर फोटो केला शेअर

Ranveer-Deepika Wedding Anniversary: बॉलीवूडचे शाही जोडपे दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. या जोडप्याने 14 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा 5 वा वाढदिवस साजरा केला. पण हे कपल त्यांचा स्पेशल डे सेलिब्रेट करण्यासाठी कुठे गेले होते याचाही खुलासा झाला आहे. या जोडप्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये या जोडप्याने लग्नाचा 5 वा वाढदिवस साजरा केला. येथील एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या जोडप्याचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि रणवीर सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यादरम्यान दीपिका पांढऱ्या रंगाच्या हुडीमध्ये तर रणवीर काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये डोक्यावर टोपी घातलेला दिसत आहे.

रणवीर आणि दीपिकाचे नुकतेच 2018 साली इटलीमध्ये लग्न झाले होते. या दोघांची प्रेमकहाणी रामलीला या चित्रपटापासून सुरू झाली होती. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दीपिका पदुकोण लवकरच ‘फायटर’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या स्पाय थ्रिलर चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशन दिसणार आहे. त्याचबरोबर ‘डॉन 3’ चित्रपटात रणवीर सिंग काम करताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…