रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, डिप्लोमा आणि पदवी उत्तीर्ण उमेदवारांनी जरूर अर्ज करावा 

Railway Trainee Apprentice Recruitment 2023: तुम्ही रेल्वेमध्ये जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कोकण रेल्वेने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार रेल्वेमध्ये ट्रेनी अप्रेंटिस पदावर भरती केली जाणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत साईट konkanrailway.com वर जाऊन अर्ज करावा लागेल . या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. येथे दिलेल्या थेट लिंकच्या मदतीने उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेद्वारे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवाराच्या 190 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून संबंधित क्षेत्रातील पदवी/डिप्लोमा प्राप्त केलेला असावा.

अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. जे उमेदवार सर्व टप्पे पार करतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळेल.

या भरती मोहिमेअंतर्गत, पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 9,000 रुपये मानधन दिले जाईल. तर डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 8,000 रुपये मानधन दिले जाईल. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…